🕒 1 min read
सातारा : देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने देखील केंद्र सरकारला फटकारले आहे.
अशातच आता चक्क सातारा आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी ऑक्सिजन टँकरवरून आमने-सामने आल्याचं समोर आलं आहे. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सीमेवरुन जाणारा ऑक्सिजनचा टँकर अडवला. हा टँकर आपल्याच जिल्ह्यासाठी असल्याची भूमिका दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे तब्बल चार तास महामार्गावर पोलीस बंदोबस्तासह या टॅंकरचा खोळंबा झाला.
या वादानंतर फोनाफोनी करण्यात आली. अखेर तो टँकर सातारचा असल्याचे स्पष्ट झाले. एकाच वेळी दोन टँकर निघाले होते. मात्र, एका टँकरचा संपर्क तुटल्यामुळे ही गफलत झाल्याची माहिती सातारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या टँकरमध्ये १५ टन ऑक्सिजन होता. संभाषणाच्या गोंधळामुळे हा वाद निर्माण झाला होता. मात्र, अखेर पुण्याहून आलेला हा टँकर साताऱ्याचा असल्याचे निष्पन्न झाला व वाद मिटला. सायंकाळी सात वाजता हा टँकर साताऱ्यातील जिल्हा रुग्णालय व जंबो रुग्णालयात खाली करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘आता लस देताना मोदी रडतायत; जुमलेबाजीवर सरकार टिकत नाही, सत्ताजीवी भाजपने लक्षात ठेवावं’
- कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
- आजच्या सामन्यात कृणाल पांड्या दीपक हुडाच्या निशानावर; त्या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता
- केंद्राने मोफत धान्य देण्याची घोषणा केल्यानंतर भुजबळ यांनी मानले शरद पवार यांचे आभार
- मराठा आंदोलनाला मोठे यश, ‘या’ चार मागण्या झाल्या मान्य!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
