मुंबई : देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्याने अनेक राज्यांनी अशंत: लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे अनेकांचा अन्न-धान्यांचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर केंद्र सरकारच्या वतीने गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना नोव्हेंबर पर्यंत मोफत धान्य वाटप करण्यात आले होते. आता पुन्हा लॉकडाऊनची वेळ आल्याने केंद्राने पुन्हा एकदा मोफत धान्य वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्राने घेतलेल्या या निर्णयाबद्दल अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आभार मानले आहे.
या संदर्भात छगन भुजबळ यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘महाराष्ट्रात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता आणि कोरोनाला अटकाव करण्यासाठी राज्य सरकारने केलेले कडक निर्बंध लक्षात घेता सर्वसामान्य जनतेसाठी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न सुरक्षा योजना पुन्हा राबवण्याची मागणी पंतप्रधान, पियुष गोयल आणि शरद पवार यांना पत्र लिहून केली होती. या योजनेला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून आज या संदर्भात केंद्र सरकारने मे आणि जुन महिन्यांसाठी मोफत ५ किलो धान्य देणार असल्याची घोषणा केली असल्याने राज्यातील नागरिकांना याचा मोठा फायदा होणार आहे. लॉकडाऊनमुळे अनेक नागरीकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो. यामुळे समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे शरद पवार यांचे अभार.’
समाजातील गरीब घटकाला मदत मिळावी म्हणून केंद्र सरकारने गरीब कल्याण अन्न योजना पुन्हा सुरु करावी अशी मागणी केली होती. आज ती मागणी मान्य झाल्यामुळे केंद्र सरकार आणि या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे @PawarSpeaks
यांचे आभार@NCPspeaks pic.twitter.com/ixDQSYMUvv— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) April 23, 2021
महाराष्ट्र सरकारच्या वतीने देखील लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर समाजातील काही घटकांना मोफत धान्य देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यातच आता केंद्र सरकारच्या वतीने देखील मोफत धान्य वाटप करण्यात येणार असल्याने काही प्रमाणात का होईना दिलासा मिळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय ! सलग पाचव्या दिवशी कोरोनमुक्तांची संख्या अधिक, आता ‘ढिलाई’ नकोच
- कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
- आजच्या सामन्यात कृणाल पांड्या दीपक हुडाच्या निशानावर; त्या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता
- वेळीच काँग्रेस नेत्यांचे सल्ले ऐकले असते तर देशाचे स्मशान झाले नसते – पटोले
- कोरोनाच्या तणावात प्रशासनाचे जलपर्णीकडे दुर्लक्ष; इतर आजारांना मिळतंय खुलं निमंत्रण


