मुंबई : गेल्या वर्षीपासून कोरोना रोगाने जगभरात थैमान घातले आहे. या रोगावर ठोस उपचार नसल्याने सुरुवातीला सर्व देशांमध्ये टाळेबंदी करण्यात आली होती. भारतात देखील मार्च महिन्यापासून कोरोना रोगाने थैमान घातल्यामुळे टाळेबंदी लागू करण्यात आली होती. यामुळे विविध क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांना मोठा फटका बसला असून लाखो लोकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे.
या टाळेबंदीमुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून आता पुन्हा एका देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. दरम्यान, रोजगार गमावल्याने अनेकांच्या उदर्निवाहाचा प्रश्न देशात गंभीर झाल्याने काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
https://twitter.com/INCMaharashtra/status/1385605962115866624?s=20
‘प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख, वर्षाला २ कोटी रोजगार, ५ ट्रिलियन डॉलर इकॉनामी, २० लाख कोटींचं पॅकेज, लसीसाठी ३५ हजार कोटी…मोदींनी काय काय बाता मारल्या होत्या आणि आता लोकांना साधी लस देताना रडत आहेत. जुमलेबाजीवर फार काळ सरकार टिकत नाही हे सत्ताजीवी भाजपने लक्षात ठेवावं.’ असा घणाघात काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून करण्यात आला असून यासोबत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुणे सावरतंय ! सलग पाचव्या दिवशी कोरोनमुक्तांची संख्या अधिक, आता ‘ढिलाई’ नकोच
- कोरोना बाधितांनी घरीच उपचार घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
- आजच्या सामन्यात कृणाल पांड्या दीपक हुडाच्या निशानावर; त्या अपमानाचा बदला घेण्याची शक्यता
- केंद्राने मोफत धान्य देण्याची घोषणा केल्यानंतर भुजबळ यांनी मानले शरद पवार यांचे आभार
- ‘भाजप नेते लोकांच्या मृतदेहावर उभे राहून पुन्हा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतायत’


