पुणे : “महापालिकेच्या कार्यपत्रिकेवर काँग्रेस नगरसेवकाच्या विरोधात असलेला प्रस्ताव मंजूर करा आमच्याकडून तीव्र विरोध होणार नाही” असा शब्द एका ज्येष्ठ व प्रमुख नगरसेवकाने भाजपच्या पदाधिकार्यांना दिला. मात्र या फोनची क्लीप व्हायरल झाल्यानंतर या काँग्रेसच्या दोन नगरसेवकामध्ये जोरदार वाद झाला. हा वाद प्रदेश पातळीवरील नेत्यांपर्यंत पोहोचला. त्यानंतर हा वाद शांत करण्यासाठी बुधवारी होणारी मुख्यसभा तहकुब करण्यात आली.
आज सकाळी साडे अकरा वाजता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याची मुख्यसभा बोलवण्यात आली होती. कामकाज सुरू होताच काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी बांग्लादेशात मंदिरांवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध म्हणून व यात केंद्र सरकारने भूमिका घेण्याची विनंती करावी अशी तहकुबी मांडली.
तहकुब करताना पुढची सभा ऑक्टोबर महिन्यात घ्यायची की नोव्हेंबर महिन्यात घ्यायची यावरून सत्ताधारी व विरोधकात किरकोळ वाद झाले. त्यानंतर अखेर २५ ऑक्टोबर रोजी मुख्यसभा घेण्याचा निर्णय झाल्याने हा वादग्रस्त विषय काही दिवस पुढे ढकलला गेला. मात्र, रात्री झालेल्या काँग्रेसमधील राड्याची चर्चा पालिकेत रंगली होती.
दरम्यान, नगरसेवकाच्या संस्थेच्या ताब्यातून काढूनचा विषय क्रमांक २९९ हा ऑक्टोबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवर आहे. यावरून भाजप व काँग्रेस मधील दोन नगरसेवकांची टोकाची भांडणे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘दोन्ही हातांनी मिळेल ते लुटायचे हीच तर राज्य सरकारातील मंत्र्याची खासियत’
- मराठी खासदारांसाठी हक्काचे स्थान म्हणजे गडकरींचे निवासस्थान – विनायक राऊत
- माझ्यासारख्या शिवसैनिकाला संपवण्यासाठी मंत्रिपदाचा गैरवापर; रामदास कदमांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- खा.रजनी पाटील यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट
- शिल्पा-राज कुंद्राने शर्लिन चोप्राविरोधात कोर्टात ठोकला ५० कोटींचा मानहानीचा दावा


