जालना : जिल्हात कोरोनाचा वाढता कहर लक्षात घेता जिल्हाधिकारीनी संपूर्ण जिल्ह्यात आठवडी बाजार भरण्यास बंदी आणलेली असताना सुद्धा केदारखेडा येथे भर रस्त्यावर बाजार भरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कैऱ्यांची टोपली दाखवण्याचे काम केले आहे. या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाला कोणी जुमानत नाही का असा प्रश्न उपस्थित होतो.
केदारखेडा ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार केवळ फोटोसेशन पुरताच सुरु आहे की काय, अशी शंका आता येवू लागली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिलेले असताना प्रत्यक्षात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्याचे काम सुरु आहे.
गुरुवारी केदारखेडा येथील आठवडी बाजाराला परवानगी देण्याचे काम ग्रामपंचायत प्रशासनाकडुन केल्या गेले. बाजारात दुकाने थाटलेली होती, विना माक्स मालाची विक्री सुरू होती, शिवाय लग्न कार्यास परवानगी नसताना देखील केदारखेडा येथे आठ दिवसापूर्वी शेकडो च्या उपस्थितीत कोरोनाच्या उपाययोजना न पाळता विवाहसोहळे पार पडले. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाकडुन कानाडोळा केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- बाळासाहेबांचा शिवसैनिक उभा आहे, चौकशीची मागणी मीच करतोय- अरविंद सावंत
- सदाबहार, ज्येष्ठ गायिका आशा भोसलेंना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर !
- मराठा आरक्षण : अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली साष्टपिंपळगाव ग्रामस्थांची भेट
- बीड जिल्ह्यात लॉकडाऊनमध्येही होणार विद्यापीठाच्या परीक्षा
- शिमग्याला घरोघरी देवांची पालखी नेण्यास बंदी; होळीसाठी नियमावली जाहीर !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

