मुंबई : युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना दिला जाणार आहे. महाराष्ट्राच्या सोलापूर मधील रणजितसिंह डिसले यांच्या नावाची काल शिक्षण क्षेत्रातील नोबेल पुरस्कार अशी ओळख असणार्या मानाच्या ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर त्यांच्यावर कौतुकाचा, अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
रणजितसिंह यांना १ मिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ७ कोटीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्काराच्या एकूण रक्कमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केले असून, यामुळे ९ देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. डिसले गुरुजींना मिळालेली रक्कम ते टीचर इनोव्हेशन फंड करीता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवोपक्रमशिलतेला चालना मिळणार आहे.
लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या समारंभात सुप्रसिद्ध अभिनेते स्टीफन फ्राय यांनी डिसले गुरुजींच्या नावाची अधिकृत घोषणा केली. असा पुरस्कार मिळणारे ते पहिलेच भारतीय शिक्षक ठरले आहेत. जगभरातील १४० देशांतील १२ हजारहुन शिक्षकांच्या नामांकनातून अंतिम विजेता म्हणून डिसले गुरुजींची घोषणा करण्यात आली आहे. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्रचं नव्हे तर देशातील शिक्षण क्षेत्रांत अभिनवं क्रांती केलेल्या कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
महत्वाच्या बातम्या
- पकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे : आप
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- ‘जुग जुग जियो’च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

