औरंगाबाद : दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नसल्याने जवळपास ५ हजार रुग्ण होम आयसोलेशन अर्थातच घरी राहून उपचार घेत आहेत. मात्र आता पूर्वीप्रमाणे निर्जंतुकीकरण केले जात नाही. हि बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे लवकरात लवकर रुग्ण असलेले भाग पुन्हा निर्जंतुकीकरण करण्यास सुरुवात करण्यात यावी. अशी मागणी शहर परिवर्तन आघाडीद्वारे करण्यात आली.
गतवर्षी एखाद्या भागात रुग्ण आढळला तर त्या भागात मनपातर्फे फवारणी केली जायची मात्र आता तसे काहीच केले जात नाही. मागच्या वेळी रुग्ण रुग्णालयात भरती असतांना या उपाययोजना केल्या जायच्या. आता तर रुग्ण घरी उपचार घेत असून देखील फवारणी करण्यात येत नाही हि बाब लक्षात घेत शहर परिवर्तन आघाडीचे राहुल इंगळे यांनी मनपा प्रशासक पांडेय यांना पुन्हा फवारणी करण्यात यावी याबाबत एक निवेदन दिले आहे.
रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्यावेळी सर्वांच्या मदतीने आपण कोरोनाला आळा घातला होता. गेल्यावेळी रुग्ण आढळताच फवारणी केली जायची मात्र आता रुग्ण घरी असून देखील असे केले जात नाही. हि अतिशय गंभीर बाब आहे. पुन्हा फवारणी सुरु व्हायला हवी. अशी मागणी त्यांनी या निवेदनाद्वारे केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘वाझेला उघडपणे पाठीशी घालणारे मुख्यमंत्री आता राजीनामा का देत नाहीत ?’
- दोन वर्षे उलटूनही सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय दुरुस्तीच्या प्रतिक्षेत!
- कामाच्या वेळेत झोपता कसे काय? असं विचारल्याने मुजोर मेडिकल ऑफिसरने केली शिवीगाळ
- कामाच्या वेळेत झोपता कसे काय? असं विचारल्याने मुजोर मेडिकल ऑफिसरने केली शिवीगाळ
- कडक लॉकडाऊनचे निव्वळ ‘ख्वाब’, आम खास मैदानावर शेकडोंचा ‘मॉब’!


