Share

कामाच्या वेळेत झोपता कसे काय? असं विचारल्याने मुजोर मेडिकल ऑफिसरने केली शिवीगाळ

Published On: 

नांदेड – राज्यभरात सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. नागरिकांना या काळात मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. आरोग्य यंत्रणांनी सुद्धा या काळात कौतुक करावे असे काम केलेले आहे मात्र एका मुजोर कर्मचाऱ्यामुळे डॉक्टरी पेशाला खाली पाहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.

अवघ्या महाराष्ट्राची मान शरमेने झुकावी असा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.आरोग्य वर्धिनी केंद्र मालेगाव,तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड येथील डॉ. विलास धनगे हे एका नागरिकाशी अतिशय उर्मटपणे बोलत असल्याचे यात दिसून येत आहे. खरेतर कोणताही सरकारी कर्मचारी हा लोकशाही मध्ये लोकांचा सेवक असतो लोकांचे काम करण्यासाठीच तो तेथे नियुक्त असतो मात्र अश्या पद्धतीने जर कर्मचारी नागरिकांशी वागत असतील तर याचा न्याय कुणाकडे मागायचा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

काय आहे नेमका प्रकार ?

जेव्हा हा जेष्ठ नागरिक या केंद्रात गेला तेव्हा डॉ. विलास धनगे हा झोप काढत होता. यावर तुम्ही कामाच्या वेळेत झोपता कसे काय हे विचारल्याने या डॉ. विलास धनगेचा पारा चांगलाच चढला. यानंतर माझी तब्येत खराब आहे असं सांगत डॉ. विलास धनगेने या जेष्ठ नागरिकाला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.

मी या ठिकाणचा मालक आहे तुमच्या कडून काय करायचं ते करा मी कुणाला घाबरत नाही असे देखील हा मुजोर डॉक्टर बोलताना दिसून येत आहे. नोकरीची पण मला गरज नाही असे देखील तो बोलत आहे.दरम्यान, सोशल मिडीयावर हा व्हिडीओ चागलाच व्हायरल होत असून संबंधित डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

https://www.facebook.com/111843057515476/videos/299649981557804/

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!