Share

दोन वर्षे उलटूनही सिद्धार्थ प्राणिसंग्रहालय दुरुस्तीच्या प्रतिक्षेत!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष, अपुरी जागा, चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेली प्राण्यांच्या पिंजऱ्यांची मांडणी यामुळे महापालिकेचे सिद्धार्थ उद्यान व प्राणिसंग्रहालय गेल्या काही वर्षांपासून वादात सापडले आहे. प्राणिसंग्रहालयात तातडीची कामे केली जातील, असे आश्‍वासन महापालिकेने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला दिले होते. त्यानंतरच प्राणिसंग्रहालयात एका वर्षाची मान्यता देण्यात आली. पण दोन वर्षे उलटले तरी आवश्‍यक कामे झालेली नाहीत.

यंदाच्या अर्थसंकल्पात पाच कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी प्राणिसंग्रहालय विभागाने केली पण अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे सडलेल्या जाळ्या, पडलेल्या भिंती हे चित्र प्राणिसंग्रहालयात कायम राहणार आहे. सिद्धार्थ उद्यान-प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना सोयी-सुविधा देण्यासाठी मास्टर प्लान तयार करण्यात आला होता. पण मिटमिटा भागात सफारी पार्क विकसित करण्यात येणार असल्याचे कारण देत महापालिकेने हा मास्टर प्लान गुंडाळून ठेवला.

त्यामुळे केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २६ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेच्या प्राणिसंग्रहालयाची मान्यता रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला. त्यावेळी प्राधिकरणाने ४५ त्रुटी काढून त्या दूर करण्याचे करण्याचे आदेश महापालिकेला दिले होते. त्यात प्राण्यांचे पिंजरे मोठे करणे, परिसरात सुरू असलेली टॉय ट्रेन बंद करणे, प्राणिसंग्रहालयाची जागा वाढविणे, भिंतीची डागडुजी करणे अशा कामांचा समावेश होता.

दोन वर्षांपासून पत्रव्यवहार

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने प्राणिसंग्रहालयाला दिलेली एका वर्षाची मुदतवाढ देखील संपली आहे. त्यामुळे देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी प्राणिसंग्रहालय विभागाकडून दोन वर्षांपासून केली जात आहे. गतवर्षी फक्त १० ते १२ लाखांची कामे करण्यात आली. यंदा पाच कोटीची मागणी करण्यात आली होती पण अर्थसंकल्पात कुठलीही तरतूद करण्यात आलेली नाही.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!