🕒 1 min read
मुंबई : हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला होता. या धमाकेदार टीझरने चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढवून ठेवली होती. आता या चित्रपटातील आणखी एक गाणे प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटातील ‘माझे गाव’ हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे.
दरम्यान या चित्रपटातील शिर्षक गीत काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते आणि त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ‘झिम्मा’ चित्रपटातील ‘माझे गाव’ हे अतिशय वेगळ्या धाटणीचे गाणे सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. या गाण्याला अमितराज यांनी संगीत दिले असून अपेक्षा दांडेकर यांनी हे गाणे गायले आहे. ‘कुठल्या नभाच्या पार आहे माझे गाव’ असे या गाण्याचे शब्द आहेत. हे गाणे ऐकताना आपले मन शांत होते. विचारांचा वेग मंदावतो आणि ओठांवर मंद हास्य उमटते. ही या गाण्याची जादू आहे. ‘झिम्मा’ चित्रपट १९ नोव्हेंबरला सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटात वेगवेगळ्या वयाच्या आणि वेगवेगळी पार्श्वभूमी असलेल्या स्त्रिया काही काळ जबाबदाऱ्या बाजूला ठेवत मनमुराद जगण्यासाठी इंग्लंडला जातात आणि मग काय धम्माल होते, हे लवकरच प्रेक्षकांना ‘झिम्मा’मधून पाहायला मिळणार आहे. सिनेसृष्टीतील सात वेगळ्या धाटणीच्या अभिनेत्री एकाच चित्रपटात पाहायला मिळणे, ही प्रेक्षकांसाठी खरंच पर्वणी ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अजित पवारांशी संबंधित कोणत्याही संपत्तीवर टाच किंवा त्यासंदर्भातील नोटीसही नाही’
- ३० नोव्हेंबरपर्यंत राज्यात किमान पहिल्या डोसमध्ये १०० टक्के लसीकरण करा- मुख्यमंत्री ठाकरे
- देगलूरचा विजय म्हणजे जनतेचा आघाडीवरील विश्वास- नाना पटोले
- पराभवानंतर सुभाष साबने यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले…
- शिवसेनेच्या वाघिणीने मैदान मारलं, मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा दारूण पराभव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
