Share

सामन्यांची निराशा, पेट्रोल डिझेलबाबत अर्थसंकल्पात कोणतीच घोषणा नाही

Published On: 

मुंबई : अर्थमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ आज विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी मोठ-मोठ्या घोषणा केल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पण जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जगभरात सुरु असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.

महाविकास आघाडीचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी २ वाजता विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात तरी कमी होण्याची शक्यता होती. राज्यातील जनतेला सरकार दिलासा देऊन पेट्रोल-डिझेल दरात सवलत मिळण्याची शक्यता सामान्य नागरिकातून होत होती. परंतु सामान्य नागरिकांची घोर निराशा झाली असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

सध्या राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर व्हॅट आणि सेस आकारला जातो. पेट्रोलवर २५ टक्के व्हॅट आणि १०.२० रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. तर डिझेलवर २१ टक्के व्हॅट आणि ३ रुपये प्रति लिटर सेस आकारला जातो. राज्य सरकारकडून आकारण्यात येणाऱ्या सेसमध्ये दुष्काळ सेसचाही समावेश आहे. महिला दिनी हा अर्थसंकल्प सादर होत असल्याने महिलांसाठी विशेष घोषणा झाल्या पण इंधनावरील कराकडे मात्र अर्थसंकल्पात दुर्लक्ष केले गेले आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!