Share

‘शाहरूख खान राम मंदिराच्या मध्यस्थीसाठी तयार होता!’

Published On: 

नवी दिल्ली : राम मंदिरासाठी प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान याने मध्यस्थी करावी अशी न्यायमूर्ती शरद बोबडे यांची इच्छा होती, असं खळबळजनक वक्तव्य सर्वोच्च न्यायालयाचे बार असोशिएनचे अध्यक्ष विकास सिंह यांनी केले. न्या.बोबडे यांच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. विशेष म्हणजे शाहरुख खान हाही राम मंदिराच्या मध्यस्थीसाठी तयार होता असे विकास सिंह यांनी म्हटले. सिंह यांच्या या विधानामुळे विविध चर्चांना उधान आलेय.

शरद बोबडे यांनी भारताचे ४७ वे सरन्यायाधीश म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये शपथ घेतली होती. आज शुक्रवारी ते पदावरून कार्यमुक्त झाले. बोबडे यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वांच्या प्रकरणाचा निकाल लागला. ऐतिहासिक अयोध्या निकाल त्यांच्याच खंडपीठाने दिला होता. याच संदर्भात विकास सिंह यांनी केलेल्या वक्तव्य केले. अभिनेता शाहरुख खानने राम मंदिर प्रकरणात मध्यस्थी करावी अशी बोबडे यांची इच्छा होती. पण काही कारणांनी हा मुद्दा बाजूला पडल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, शरद बोबडे यांच्यानंतर न्यायमूर्ती एन.व्ही.रमणा हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश होणार आहेत. शरद बोबडे यांनी त्यांच्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस एक महिना आधी केली होती. सरन्यायाधीश बोबडे यांनी केंद्रीय कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांना लिहिलेल्या पत्रात रमणा हे सर्वात योग्य असल्याचे म्हटले होते. एन.व्ही.रमणा उद्या शनिवारी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतील. दरम्यान यावेळी ॲटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायधीशांचा कार्यकाळ हा किमान तीन वर्षाचा असावा, असे मत मांडले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!