Share

कोरोना चाचणीत औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाचा महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

Published On: 

औरंगाबाद : २४ तास कार्यरत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालयाच्या (घाटी) प्रयोगशाळेने कोरोना चाचण्यांचे परीक्षण करण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्यातील कोरोनाचा कहर वाढत आहे. यावर चाचण्या करून रुग्णसंख्या आटोक्यात आणणे हा एकच पर्याय आहे.

आतापर्यंत सर्वांत जास्त ३ लाख ९ हजार ७८८ नमुन्यांचे परीक्षण करून अहवाल देण्यात आला असल्याची महत्वपुर्ण माहिती समोर आली आहे. घाटीची व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेत जिवाची बाजी लावत अहोरात्र काम करणारे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, डॉक्टर्स व इतर सहायक आहेत. एप्रील २०२० पासून ही प्रयोगशाळा रुग्णांच्या अहवालाचे विश्‍लेषण करत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यानंतर पर्यायाने चाचण्यांची संख्या देखील दरदिवशी ५ हजारांवर गेलेली आहे. तरीही येथील प्रयोगशाळेत चाचण्यांचे परीक्षण तसेच कोराेना तपासणी करुन त्याचे अहवाल देण्याचे काम रात्रंदिवस नित्यनियमांने अविरतपणे सुरू आहे.

या वेळी महाराष्ट्रामझून पहिला क्रमांक औरंगाबादचे घाटी रुग्णालय (३,०९,७८८) तर  दुसरा क्रमांक एनआयव्ही पुणे (३,०२,७८८),  तिसरा  बीजेजीएमसी पुणे (२, ९९. ८८०), चौथा क्रमांक आरसीएसएम जीएमसी कोल्हापूर (२,७६,९१२), पाचवा एमएमटीएच, नवी मुंबई (२,६९,१४०), सहावा  आयजीएमसी नागपूर (२,६४,८७४) तसेच सातवा क्रमांक हा जीएमसीएच, नागपूर (२,२६,८९०) असा समावेश करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या         

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!