राजू थोरात, तासगाव : मांजर्डे गावच्या निवडणुकीकड़े सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. दिनकर पाटील यांचे 6 ते 7 महिन्यापूर्वी अकाली निधन झाले होते. स्व. आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील आपल्या भाषणात कायम दिनकर पाटील यांचा उल्लेख हंबीर मामा असे करत असत.
दिनकर पाटील यांचे निधन झाल्यानंतर मांजर्डे गावचे राष्ट्रवादी नेते मोहन पाटील यांना रोहित पाटील यांना सांगितले की, ‘एक हबीरमामा गेले म्हणून धीर तूटू देउ नका. मांजर्डे गावातून हजारो हंबीर मामा तयार करून स्वर्गीय आर आर आबा कुटुंबाचे रक्षण करतील…’ दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी लढत झाली. रोहित पाटील यांनीही गावात सभा घेतली. तर खासदार संजय पाटील यांनीही 1 दिवस मोटरसायकलवर फिरुन वार्ड वाइज बैठका घेतल्या.
आर आर आबा पाटील व दिनकर पाटील यांच्या निवडणुकीत सभा गाजवणारा राहुल मोहिते…
राहुल मोहिते हा मांजर्डे गावचा युवक असून विश्व् मराठी साहित्य संमेलन अंदमान मध्येही सहभागी झाला होता. ग्रामपंचायत निवडणुकीत दिनकर पाटील यांचा बालेकिल्ला अविरत विजयी घोडदौड कायम ठेवण्यामध्ये त्यांचे कार्य, मोहन पाटील यांचे संघटन कौशल्य आणि राहुल मोहिते यांचे वादळी वक्तृत्व हा लोकांच्यातील चर्चेचा विषय आहे.
आर आर पाटील यांचे निधन झाल्यानंतर तालुक्यातील अनेक निवडणुकांमध्ये दिनकर पाटील यांनी मांजर्डेच्या प्रतिनिधी स्वरूपात राहुल मोहिते यांचं वक्तृत्व तासगाव तालुक्यातील लोकांच्या समोर आणलं होतं. आज जरी मांजर्डे ग्रामपंचायत निवडणूक एकतर्फी झाली असली तरी 2015 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला 15 पैकी 9 जागा जिंकता आल्या होत्या. त्यामध्ये मांजर्डेतील दत्तनगर परिसराचा वाटा होता त्यातच राहुल मोहिते यांनी सभा गाजवल्या होत्या.
आमदार सुमन पाटील यांच्या विधानसभा किंवा तासगाव नगरपालिकेची निवडणुक असो दिनकर पाटलांचा पठ्ठ्या राहुल मोहिते राष्ट्रवादी पक्षासाठी मोठं भव्यिष्य ठरेल अशी नागरिकांच्यात चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या
- अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी लावलेले अनधिकृत फलक काढले म्हणून पोलिसांचा दुखावला इगो !
- आईवडिलांचा सांभाळ करा, अन्यथा वेतनातून रक्कम कपात
- ‘सरकार गोट्या खेळतय का ? वेळकाढूपणा खपवून घेणार नाही’
- …तर राज्यात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही; वीजबिलावरून दरेकरांचा उद्धव ठाकरेंना इशारा
- सिरममधील आगीमागे नेमकं कारण काय ? राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

