मुंबई : कोरोना काळात अनेक घटना कायमच्या मनात घर करुन राहिल्या आहेत. संकटाच्या या काळात एकमेकांना मदत केल्याच्या घटना रोजच पाहायला मिळत आहेत. अशाीच एक हृदयस्पर्शी घटना दिघी पोलीस स्टेशनमध्ये घडली. या घटनेचा व्हिडीओ पोस्ट करत राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिघी पोलिसांचे कौतूक केले आहे.
या संदर्भात सतेच पाटील यांनी म्हटले की, ‘पुण्यातील दिघी येथे आईच्या मृतदेहाजवळ २ दिवस उपाशी राहिलेल्या दीड वर्षाच्या बाळाला दिघी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस सुशिला गभाले व रेखा वाजे यांनी या बाळाला जवळ घेत मायेचा घास भरविला. या दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मातृत्वाला माझा सलाम!’
हृदयस्पर्शी!
पुण्यातील दिघी येथे आईच्या मृतदेहाजवळ २ दिवस उपाशी राहिलेल्या दीड वर्षाच्या बाळाला दिघी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस सुशिला गभाले व रेखा वाजे यांनी या बाळाला जवळ घेत मायेचा घास भरविला. या दोन्ही महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या मातृत्वाला माझा सलाम! @PuneCityPolice pic.twitter.com/DKoBfOOJBs— Satej (Bunty) D. Patil (@satejp) April 29, 2021
या घटनेतील महिला ही मुळ उत्तर प्रदेश मधील रहिवासी असून दिघी परिसरातील फुगेवस्तीमध्ये भाड्याने राहत होती. पती गावी गेल्यामुळे ही महिला आणि दिड वर्षाचा मुलगाच घरी होते. त्यांच्या खोलीमधून वास आल्याने पोलिसांना बोलावण्यात आले होते. या मुलाची प्रकृत्ती उत्तम असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सुनील मानेच्या मोबाईलमध्ये चेंबूर ते अँटेलिया नकाशा; NIAची माहिती
- जालना जिल्ह्यातील १७० गरोदर मातांना कोरोनाची बाधा
- अबब! एकाच कसोटी सामन्यात १३०० धावा
- ‘मोदींच्या मुत्सद्दीपणामुळे विदेशातून मदतीचा ओघ’, देवेंद्र फडणवीस यांचा दावा
- ‘22 गावांच्या त्यागातुन उजनी प्रकल्प उभा राहिल्याने पाण्यावर पहिला अधिकार प्रकल्पग्रस्तांचाच आहे’


