जालना: कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या काळात गरोदर मातांचे आरोग्य जपताना डॉक्टरांसह नातेवाइकांना मोठी काळजी घ्यावी लागत आहे. जिल्हा महिला व बाल रुग्णालात प्रसूतीसाठी येणाऱ्या प्रत्येक मातेची कोवीड चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत १७० गरोदर मातांना कोरोनाची लागण झालेली असून, पैकी १६१ महिलांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.
येथील गांधीचमनवरील जिल्हा व महिला रुग्णालयात महिन्याला ५५० ते ६०० महिला प्रसूतीसाठी येतात. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या महिलांची संख्या अधिक असते. दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ कोरोना बाधितांवरच उपचार केले जात आहेत. त्यामुळे येथे अन्य आजारांसाठी येणाऱ्या रुग्णांची बाह्य रुग्ण तपासणी जिल्हा महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आलेली आहे.
त्यामुळे या ठिकाणी विविध उपचारांसाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, अनेकदा गरोदर माता खाजगी रुग्णालात उपचार घेऊन प्रसूतीसाठी महिला रुग्णालयात येतात. त्यामुळे गरोदर मातांसह येथे काम करणारे डॉक्टर, परिचारिका व लहान बालकांच्या सुरक्षेसाठी महिला रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक गरोदर मातेची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- रामदास आठवले एक महिन्याच्या वेतनातून आंबेडकरी कलावंतांना मदत करणार
- शाळा, कम्युनिटी हॉल आणि पार्किंगचा वापर लसीकरण केंद्र म्हणून करा : भाजपा
- लशीच्या वेगवेगळ्या किंमतीवरुन जावेद अख्तर भडकले,ट्वीट करत केली नाराजी व्यक्त
- ‘नंदूरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी संस्थेला एक हजार रेमडेसिविर देणे धक्कादायक’
- पुनावाला यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयाने पुरवली ‘वाय’ दर्जाची सुरक्षा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

