मुंबई : अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केली आहे. तर, एटीएसने देखील सचिन वाझेंना या प्रकरणात आरोपी म्हणून घोषित केलं आहे.
मनसुख हिरेन प्रकरणात NIAने काही दिवसांपूर्वी सुनील माने या पोलिस अधिकाऱ्याला अटक होती. सुनील माने याला मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेरील स्फोटक प्रकरणाचीही पूर्ण कल्पना होती, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने केला आहे. सुनील मानेच्या मोबाईलमधून एक मॅप एनआयएच्या हाती लागला आहे. हा नकाशा प्रियदर्शनी पार्क, चेंबूर ते अँटेलिया परिसरापर्यंतचा आहे, अशी माहितीही एनआयएने दिली आहे.
तसेच सुनील माने यानेच तावडे बनून मनसुख यांना फोन करुन बोलावून घेतलं. त्यानंतर सचिन वाझे आणि सुनील माने एकत्र त्याला भेटले. मनसुख हिरेन यांना भेटताच सुनील माने याने मनसुखचा मोबाईल स्वतःकडे घेतला आणि बंद केला. मनसुख यांना दुसऱ्या गाडीत बसलेल्या काही लोकांच्या हवाली केलं. ज्यामध्ये विनायक शिंदे होता. त्यानेच मनसुख यांची हत्या केल्याचा अंदाज आहे. त्यानंतर माने आणि वाझे मनसुखचा मोबाईल घेऊन वसई परिसरात गेले. त्यांनी काही वेळ मनसुखचा मोबाईल सुरु केला, जेणेकरून पोलिसांना तपासादरम्यान मनसुखचं शेवटच लोकेशन वसई परिसरात मिळावं आणि तपासाची दिशा भरकटली जावी. सुनील माने याने स्फोटके प्रकरणात वाझेला काय काय मदत केली याचा तपास एनआयएकडून सध्या केला जात आहे.
महच्वाच्या बातम्या
- अबब! एकाच कसोटी सामन्यात १३०० धावा
- मिलिंद नार्वेकरांची मुंबई प्रीमिअर लीग T20 कोरोनामुळे लांबणीवर
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- जालना जिल्ह्यातील लसीचा साठा संपला, अनेक लाभार्थी लसीविनाच परतले
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांना कोरोना
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

