कँडी : भारतात सध्या आयपीएल स्पर्धा सुरु आहे. यादरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेशचा संघ हा श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात बांगलादेशचा संघ दोन कसोटी सामन्याची मालिका खेळत आहे. यातील पहिला कसोटी सामना हा अनिर्णीत झाला होता. या कसोटी सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत ७ गडी गमावत ५४१ धावांवर डाव घोषित केला होता. तर दुसऱ्या डावात २ गडी बाद १०० धावा केल्या होत्या. तर श्रीलंकेच्या संघाला या सामन्यात एकदाच फलंदाजी करण्याची संधी मिळाली होती. या श्रीलंकेच्या संघाने ८ बाद ६४८ धावा करत डाव घोषित केला होता.
या सामन्यात ७५.८२ च्या सरासरीने तब्बल १२८९ धावा झाल्या होत्या. तर केवळ १७ गडी बाद झाले होते. त्यामुळे या खेळपट्टीवर सामनाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सामनाधिकारी रंजन मदुगले या खेळपट्टीबाबत बोलतांना म्हणाले, ‘ ही खेळपट्टी पूर्ण सामन्यात फलंदाजीसाठी अनुकूल होती.’ त्यामुळे आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या खेळपट्टीवर सामना झाला त्या खेळपट्टीला सरासरीने खराब रेटिंग देण्यात आले.
High-scoring first Test ends in a draw after rain washes out final session.#SLvBAN report ????
— ICC (@ICC) April 25, 2021
आयसीसीच्या नियमानुसार सरासरीपेक्षा खाली रेटिंग असलेल्या खेळपट्टीला एक डीमेरिट अंक, तर खराब आणि अनफिट खेळपट्ट्या असलेल्या जागेला अनुक्रमे तीन आणि पाच डीमेरिट गुण दिले जातात. हे डीमेरीट गुण ५ वर्षापर्यंत लागु असतात. या नियमानुसार जर एखाद्या खेळपट्टीला ५ किंवा त्यापेक्षा जास्त डीमेरीट गुण दिले तर स्टेडियमवर १२ महिने आंतरराष्ट्रीय सामने आयोजन करण्यावर बंदी घालण्यात येते. जर १० डीमेरीट गुण झाले तर त्या स्टेडियमवर २४ महिने आंतरराष्ट्रीय सामने आयोजित करण्यावर बंदी घालण्यात येते.
महच्वाच्या बातम्या
- ‘22 गावांच्या त्यागातुन उजनी प्रकल्प उभा राहिल्याने पाण्यावर पहिला अधिकार प्रकल्पग्रस्तांचाच आहे’
- मिलिंद नार्वेकरांची मुंबई प्रीमिअर लीग T20 कोरोनामुळे लांबणीवर
- मोठी बातमी : देशातील दीडशे जिल्ह्यांत कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता
- जालना जिल्ह्यातील लसीचा साठा संपला, अनेक लाभार्थी लसीविनाच परतले
- कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेले राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांना कोरोना


