जालना : भाजप नेते गोपचंद पडळकर यांच्या गाडीवर युवकाने हल्ला केल्याची घटना घडलीय. सोलापूर जिल्ह्यातील या घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या घटनेवर भाजप युवा मोर्चाचे राज्य संघटन महामंत्री राहुल लोणीकर यांनी टीका केलीय. या घटनेमुळे महाराष्ट्रातील वसुली सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपवत असल्याचा आरोप राहुल लोणीकर यांनी केला आहे. इतकेच नाही तर या भ्याड हल्ल्याचा निषेधही त्यांनी व्यक्त केलाय.
या संदर्भात राहुल लोणीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारचा समाचार घेतला. ते म्हणाले की, ‘महाराष्ट्रात खंडणीखोर वसुली सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्य संपून एकाधिकारशाही सुरू केली का? आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर भ्याड हल्ल्याचा भाजप युवा मोर्चा जाहीर निषेध करते! विचारांची लढाई विचाराने लढावी, दगडाने नाही.’
महाराष्ट्रात खंडणीखोर वसुली सरकारने 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' संपून 'एकाधिकारशाही सुरु केली का ?
आ. @GopichandP_MLC जी यांच्या गाडीवर भ्याड हल्लाचा @BJYM4MH #जाहीर_निषेध करतो.!
विचारांची लढाई विचाराने लढावी ,दगडाने नाही..!@BJP4Maharashtra @ivikrantpatil pic.twitter.com/ZwLCz9k6hi— Rahul Lonikar (@lonikar_rahul) June 30, 2021
पडळकर यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या युवकाने हल्ल्याच्या वेळी शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी केली होती. या आधी पडळकर यांनी शरद पवारांवर थेट आरोप केले आहेत. त्यामुळेच त्यांच्यावर राष्ट्रवादीने हल्ला केल्याचा आरोपही पडळकर यांनी केला आहे. मात्र, आपण अशा हल्ल्यांना घाबरत नसल्याचेही पडळकर यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘राजभवनचे अधिकारी राज्यपालांना माहिती देत नसतील तर यापेक्षा वाईट काहीच नाही’
- गुन्हा दाखल झाल्यावर पडळकर संतप्त; म्हणाले, ‘मग अजित पवारांना का सोडले?’
- ‘केंद्र सरकारला काय करायचे ते करू द्या, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागू देणार नाही’
- संतापजनक ! ‘संजय राठोडांच्या वाढदिनी शिवाजी महाराजांच्या मुर्तीभोवती फेकून दिलेले हार-बुके
- ‘चपटी लावलेली असली की लोक हत्तीलाही मुंगी समजतात’, आव्हाडांचा पडळकरांवर निशाणा


