🕒 1 min read
मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील बंडखोरीनंतर महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाचा आज सहावा दिवस आहे. इकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे नेते सरकारला वाचवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहेत. दोन्ही बाजूंमधील भांडण सुरूच आहे. यानंतर या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर युवा सेने प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे सांताक्रुझमध्ये युवासेनेच्या मेळाव्याला संबोधित करताना म्हणाले कि, बंडखोरांनी २० जून रोजी बंड पुकारला. त्यांनी बंड पुकारल्याने सर्व मान सन्मान गमावला. काल एक व्हिडिओ व्हायरल झाला, तो तुम्ही बघितलाच असेल. आज हा मेळावा गुवाहाटीतून बंड पुकारलेले आमदार बघतच असले. ते म्हणत असेल किती गर्दी झाली आहे मेळाव्याला. तसेच निवडणूक लढवा, तुम्ही पडल्याशिवाय राहणार नाही, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, काल एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ ठाणे येथील त्यांच्या लुईसवाडी निवासस्थानाबाहेर श्रीकांत शिंदे यांच्यासह समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे. यावेळी श्रीकांत शिंदे बोलताना म्हणाले कि, आज मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंच्या बरोबर उभे राहण्यासाठी तुम्ही इथे उपस्थित राहिलात. ठाण्यासोबत बाहेरही एकनाथ शिंदे यांनी जे काम केले त्यासाठी त्यांना लोकांनी समर्थन दिले. आजही एकनाथ शिंदे हे आपण शिवसैनिक असल्याचेच म्हणत आहेत, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
