Share

तबलिगी जमातीला कोरोना पसरवा असं अल्लाहनेच सांगितलं होतं काय? भोसलेंचा आव्हाडांना सवाल

Published On: 

नाशिक :  ‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है, इसलिए कब्रस्तान बना, असं वादग्रस्त विधान राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. मुंब्रा येथील एका नगरसेविकेच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन  जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी नागरिकांशी संवाद साधताना जितेंद्र आव्हाड यांनी ‘अल्लाह को पता था कोरोना आनेवाला है’, असे; वादग्रस्त विधान केलं.

‘ २०११ में अल्लाह को मालूम था, कोरोना आनेवाला है. तभी मुंब्रा में २०१९ में कब्रस्तान बना’, अशी मुक्ताफळे आव्हाड यांनी उधळली आहेत. तुम्ही म्हणता जे काही होतं ते अल्लाच करतो. हे कब्रस्तानही अल्लानेच बनवले आहे, असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे.

आव्हाड हे गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र, आता कोरोनाच्या संकटातील आपले यश – अपयश झाकण्यासाठी त्यांनी थेट अल्लाचाच आधार घेतल्याची टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे विधान करून मुस्लिम समाजाला खुश करण्याचे राजकारण आव्हाड यांनी केल्याचा सूर राज्यभर उमटत आहे.

दरम्यान, भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. ‘कोरोना येणार हे अल्लाहला जर २०११ मध्येच माहीत होतं, तर तबलिगी जमातीला कोरोना पसरवा असं अल्लाहनेच सांगितलं होतं काय?’, असा सवाल भोसले यांनी आव्हाड यांना केला आहे. तसेच काँग्रेसचं मतांसाठी चाललेल हे घाणेरडं राजकारण असल्याचा आरोप देखील भोसले यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!