औरंगाबाद : जिल्ह्यातून जाणाऱ्या १२४ कि.मी. लांबीचा धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्ग -५२ (जुना रा. म.२११) च्या कामाच्या प्रगतीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज पाहणी केली. या राष्ट्रीय महामार्गाचे काम कोरोना संसर्गाची खबरदारी घेत गुणवत्तापूर्वक व ठरवलेल्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देशही संबंधितांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिले.
यावेळी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक , प्रबंधक (तांत्रिक), शाखा अभियंता प्राधिकृत सल्लागार आदींनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना दिली. तसेच जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे कामाची गुणवत्ता राखून आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. जून अखेरीस काम पूर्णत्वास नेणार असल्याचे या वेळी सांगितले. जिल्हाधिकारी चव्हाण यांनी राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील करोडी येथे प्रस्तावित टोल प्लाझासाठी संपादित जागेची पाहणी केली.
तसेच टोल प्लाझावर वाहन धारकांसाठी स्वच्छालय, वैद्यकीय सुविधा, सीसीटीव्ही, फास्ट टँगसाठीची सुविधा व इतर आवश्यक दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश देखील दिले आहेत. त्याचबरोबर या राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबाद – करोडी या ३० कि. मी. (खर्च ५१३ कोटी रुपये) औरंगाबाद बाह्यवळण रस्ता चौपदरीकरणाच्या कामातील अडीअडचणी जाणून घेतल्या. या वेळी चर्चा करुन कामे त्वरीत पूर्ण करुन वाहतूक सुरू करण्याबाबत आदेश देखील दिलेले आहेत.
ज्यामुळे शहरामधील बीड बायपास रस्त्यावरील वाहतूक नवीन रस्त्याने वळवणे शक्य होईल. या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. तर मुरमा – औरंगाबाद (३८. ०० कि.मी.) तसेच करोडी – तेलवाडी ( ५६. ०० कि.मी.) असे एकूण ९४ कि.मी. चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असल्याची माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक काळे यांनी यावेळी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमधील डॉक्टर माझ्यासमोर अक्षरश: रडत होते- उद्धव ठाकरे
- लॉकडाऊन लावलाय पण हाताला लॉक लावून बसलेलो नाही – मुख्यमंत्री ठाकरे
- पुण्यासाठी पीएम केअर्स फंडातून मिळाले ३० व्हेंटीलेटर्स; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
- महाविद्यालयांत लसीकरण केंद्र सुरू करा! अभाविपची मागणी
- Breaking : याहून अधिक कडक लॉकडाऊन करण्याची गरज नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


