मुंबई : आयपीएल २०२२चे मेगा ऑक्शन अवघ्या काही दिवसांवर आले आहे. मेगा ऑक्शनमध्ये ५९० खेळाडूंचा समावेश आहे. ज्यात देशविदेशातील अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. आयपीएलमधील गतविजेता संघ चेन्नईतील मोठे खेळाडू सुद्धा या यादीत आहेत. चेन्नई सुपर किग्सचा जुना खेळाडू आर अश्विनने चेन्नई ऑक्शनमध्ये असलेल्या फाफ डु प्लेसीसवर मोठी बोली लावेल असे सांगितले आहे.
आर अश्विनने त्याच्या युट्युब चॅनलवर बोलताना त्याने याबाबत सांगितले आहे. चेन्नईने फाफ डू प्लेसिसला मागच्या वेळी १. कोटी मध्ये घेतले होते. मात्र यावेळी असे होणार नाही.सीएसकेच्या चाहत्यांच्या इच्छा यादीत फाफ नक्कीच असेल. सीएसकेला यावेळी फाफ डू प्लेसिसला विकत घ्यायचे असेल तर त्यांना निश्चितपणे मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त खर्च करण्याची तयारी ठेवावी लागणार आहे. माझ्या मते फाफ डू प्लेसिसला ऑक्शनमध्ये खूप मागणी असेल. बरेचसे संघ फाफसाठी बोली लावतील.
चेन्नई सुपर किंग्सकडून सलामीवीर म्हणून खेळताना फाफ डू प्लेसिसने चांगली कामगिरी केली आहे. कर्णधार महेंद्रसिंह धोनीलाही त्याचे महत्त्व चांगलेच ठाऊक असेल .अशा स्थितीत त्याचा संघात फाफचा समावेश करण्यासाठी चेन्नई नक्कीच प्रयत्न करेल. चेन्नईने ऑक्शन आधी रवींद्र जडेजा , महेंद्रसिंह धोनी , ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला रिटेन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दोन दिवस डोंगरावर अडकलेल्या त्या ट्रेकरची अखेर आर्मीने केली सुटका
- “..त्यावेळेस पत्र का लिहू वाटले नाही?”, केशव उपाध्येंचा संजय राऊतांन सवाल
- सिंह गिधाडाला घाबरत नाही. – देवेंद्र फडणवीस
- “कर्तव्य म्हणून पत्र लिहिलं, अजून ट्रेलर यायचा आहे”, संजय राऊतांचे स्पष्टीकरण
- ‘गुन्हेगार नसाल तर…’; रावसाहेब दानवेंचा राऊतांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
