🕒 1 min read
बंगळूरू : सध्या बंगळूरू येथे आयपीएलचे ,एग ऑक्शन सुरु आहे. मात्र ऑक्शनपूर्वी CSK चे सीईओ काशी विश्वनाथन यांनी चाहत्यांना मोठा दिलासा दिला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) स्वतःच टीम निवडतो. त्यामुळे तुम्ही निराश नाही होणार असे आश्वासन चाहत्यांना काशी विश्वनाथन यांनी दिले आहे.
काशी विश्वनाथन (CSK CEO Kashi Viswanathan) यांनी म्हटले की, “मला चाहत्यांना एवढेच सांगायचे आहे. प्रत्येक वेळी लिलावात एमएस धोनी संघ निवडतो आणि तो चाहत्यांना कधीही निराश करणार नाही. तो असा संघ निवडणार आहे. तुम्ही जर लक्ष दिले असेल तर प्रशिक्षक आणि चेन्नई सुपर किंग्सचे अधिकारी आयपीएल लिलावात नेहमीच उपस्थित असतात आणि ते फोनवर कोणाशी तरी बोलत असतात. त्यामुळे ते ज्या व्यक्तीशी फोनवर बोलत असतात, तो दुसरा कोणी नसून कर्णधार धोनी आहे.”
दरम्यान चेन्नई सुपर किंग्सने चार खेळाडूंना रिटेन केले आहे. ज्यामध्ये पहिले नाव रवींद्र जडेजाचे आहे ज्याला १६ कोटींमध्ये कायम ठेवण्यात आले आहे. तर एमएस धोनी १२ कोटींमध्ये कायम आहे. मोईन अली ८ आणि ऋतुराज गायकवाडला ६ कोटींसाठी कायम ठेवण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL 2022 AUCTION: ‘हा’ ठरला सर्वात पहिला सोल्ड खेळाडू; इतकी लागली बोली.
- शिवसेना मंत्र्यावर ३० कोटींची फसवणूक केल्याचा आरोप; गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश
- IPL 2022 AUCTION: हे काय! यंदा किंग खान नव्हे तर सुहाना आणि आर्यन सांभाळणार ऑक्शनमध्ये केकेआरची मालकी
- “…अन् त्याच्या बंदोबस्तासाठी पोलीस दावणीला बांधले जातात”, रुपाली चाकणकरांचा संताप
- “…भाजपचा हाच दुटप्पीपणा मराठा व ओबीसी आरक्षणासाठी दिसला”, लतादीदी स्मारक वादावरून सचिन सावंतांचा आरोप
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
