Share

वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल- आशिष शेलार

Published On: 

मुंबई : मुंबईतील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे भाजप-शिवसेना आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भाजपचे आमदार आशीष शेलार यांनी मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून मुंबई महानगरपालिकेवर टीकास्त्रांचा वर्षाव केला आहे. मुंबईतील सुमारे २ हजार किमीच्या रस्त्यावर केवळ ९२७ खड्डे आहेत असे महापालिका सांगते आहे. मग खड्डे भरण्यासाठी जे ४८ कोटींची तरतूद केली ती याच ९२७ खड्यांसाठी का? असा सवाल करत तसेच ‘वरळीत थ्रीडी मॅपिंगचा ढोल आणि मुंबईच्या रस्त्यावर खड्ड्यात झोल’ असे म्हणत त्यांनी टोलेबाजीही केली आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी संवाद साधत असतांना ते म्हणाले की,’मुंबई महापालिकेने खड्ड्याबाबत जे पोर्टल तयार केले त्यावर केवळ ९२७ खड्डे असल्याचे नमूद झाले आहे. महापालिका दररोज नवी फसवणूकीची स्पर्धाच करते आहे असे चित्र आहे. केवळ खड्डे बुजवण्यासाठी ४८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. मग तो या ९२७ खड्यांसाठीच होता का? असा सवाल ही आमदार शेलार यांनी केला. यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी सुरु आहे, चौकशीत सत्य समोर येईलच’ असे शेलार म्हणले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,’ मुंबईच्या महापौरांना आमचा सवाल आहे की, पूर्ण मुंबईचे, संपूर्ण क्षेत्रफळ तुमच्या डोळ्यांसमोर कधी असतं का? संपूर्ण मुंबईचा नकाशा विकासासाठी कधी तुम्ही पाहता का ? याचे कारण नवीन फूटपाथ करायचा विषय आला की फक्त वरळी सिग्नल आणि लाईटचे खांब सुशोभित करायचे असतील तर वरळी. मुंबईत सर्वत्र ब्रिज आहेत, पण पुलाच्या खाबांचे सुशोभीकरण फक्त वरळीत होते. आता थ्रीडी मॅपिंग करायचे आहे तर ते पण वरळीतच. कोविड सेंटर बनवायचे असेल तर तेही वरळीत आणि पाण्याचा निचरा करणारे पंप बसवायचे असतील तर मग कलानगर, वरळी आणि कलानगर पलिकडे मुंबई आहे की नाही? असेही ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!