मुंबई : वरुण धवन पत्नी नताशा सोबत अॅमस्टरडॅममध्ये सुट्टी साजरी करत आहे. या ठिकाणचा वरूण धवन आणि नताशा यांचा एक अतिशय सुंदर फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वरुण धवन आणि नताशा ही जोडी बी-टाऊनमधील सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे.
वरून धवन आणि नताशा यांचे सोशल मीडियावर क्वचितच रोमँटिक फोटो पाहायला मिळतात. हे जोडपं सुट्यांचा आनंद घेत आहे. आणि नुकताच त्यांचा एक फोटो समोर आला आहे. समोर आलेला फोटो हा या जोडप्याचा आजपर्यंतच्या सर्व फोटोपैकी रोमँटिक फोटो आहे असे म्हणले जात आहे.
https://www.instagram.com/p/CfmBA6atDOZ/?igshid=YmMyMTA2M2Y=
समोर आलेल्या या फोटोमध्ये वरुण आणि नताशा एकमेकांच्या अगदी जवळ दिसत आहेत. सुट्टीत हे जोडपे एकमेकांच्या रोमान्समध्ये पूर्णपणे बुडून गेल्याचे चित्र दिसत आहे. फोटोमध्ये नताशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये बोल्ड स्टाइलमध्ये दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


