Share

धनगर आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नव्हे तर अस्तित्वाची लढाई-गोपीचंद पडळकर

Published On: 

जालना : समाजहितासाठी धनगर आरक्षण हा श्रेयवादाचा मुद्दा नसून अस्तित्वाची लढाई आहे. ती लढाई समाजाच्या ताकदीवर जिंकणार असल्याचे दावा भारतीय जनता पक्षाचे आ.गोपीचंद पडळकर यांनी केला. धनगर समाजाला हक्काचे आरक्षण मिळावण्यासाठी विविध आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत कागदोपत्री पाठपुरावा केला आहे. शिवाय धनगड ऐवजी धनगर ही जात अस्तित्वात असल्याचे निदर्शनास आणल्याचे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये कार्यकर्ता संवाद कार्यक्रम पार पडला. यावेळी आ.गोपीचंद पडळकर यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, मेंढपाळांना मेंढराच्या पालन पोषण करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी मेंढपाळाचा प्रश्न मार्गी लावण्या बरोबरच प्रमुख व्यवसाय नजरेसमोर ठेवून मेंढपाळासाठी १० लाख कर्जाची तरतुद करण्यात आली आहे. समाजासाठी आरक्षण हा महत्वाचा मुद्दा असून त्यासंदर्भात केंद्र व राज्य सरकारमध्ये चर्चा सुरू आहे. धनगर समाजाच्या अडीअडचणी सोडविण्या बरोबरच आरक्षण मिळण्यासाठी सदैव पुढाकार घेणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाला धोंडु दिवटे, भाजप तालुकाध्यक्ष सुरेश दिवटे, जि.प.सदस्य संतोष लोखंडे, गोविंदराव पंडीत, शिवदासजी बीडकर, दिपक बोराडे, प.स.सभापती दगडुबा गोरे, जगन पंडीत, साहेबराव कानडजे, भाजपा शहराध्यक्ष निवृत्ती दिवटे, कैला दिवटे, विजय वैद्य आदी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!