Share

‘आमच्या घरांवर तुळशीपत्र ठेवले तरी चालेल पण सर्वसामान्य जनतेचे जीव वाचवले पाहिजे’, धनंजय मुंडेंचे वक्तव्य

Published On: 

🕒 1 min read

बीड: आमच्या सारख्यांच्या घरावर तुळशीपत्र जरी ठेवले तरी चालेल पण सर्व सामान्य जनतेचे जीव वाचविले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.यासाठी सर्व राजकारण्यांनी आप-आपल्या परिने होईल तशी करण्याची गरज असून,यात राजकारण आणण्याची गरज नाही, असे वक्तव्य पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आष्टी येथील एका कोविड केअर सेंटरचे उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले.

दुसऱ्या लाटेच्या रूग्णांना ऑक्सिजन, बेड व यंञसामुग्री कमी पडू न देण्याचा प्रयत्न करत असून जिल्ह्यात ऑक्सिजन प्लंट सुरू करत असून त्याचे कामही सुरू झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत मी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून प्रामाणिकपणे जबाबदारी पार पाडणार असल्याचे प्रतिपादन बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांनी केले आहे. ते आष्टी येथील कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आष्टी मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्यावतीने आष्टी शहरातील बी.डी.हांबर्डे महाविद्यालयात पन्नास बेडचे आधार कोव्हीड सेंटरचे शनिवार सकाळी सव्वा दहा वाजता बीडचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्याहस्ते करण्यात आले. ते म्हणाले लाटे लाटेत सुध्दा फरक होता. पहिल्या लाटेत एक मास्क लागत होता आणि दुस-या लाटेत दोन मास्क लावावे लागत आहे. दुस-या लाटेत रूग्णांना ऑक्सीजीनची गरज भासायला लागली, तसेच मत्यूचे प्रमाण वाढत आहे. पण येथे आज माझ्या हाताने या आधार कोव्हीड सेंटरचे उद्याटन झाले याचा मला अभिमान आहे. या कोव्हिड सेंटरला वैद्यकीय सेवा देणा-या डॉक्टरांच्या हातून चांगली सुविधा मिळवून रूग्ण लवकरात लवकर बरा होवो हिच प्रभूवैद्यनाथ चरणी प्रार्थना, असेही ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!