🕒 1 min read
मुंबई: अभिनेता कुणाल खेमू आपल्या कॉमेडी अंदाजामुळे ओळखला जातो. त्याने अनेक कॉमेडी चित्रपट केले आहेत. आज अभिनेता कुणाल खेमूचा वाढदिवस आहे. याच निमित्ताने बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी कुणाला सोशल मीडियावरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच्या अभिनय कारकिर्दीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या कारकिर्दीप्रमाणंच त्याची लव्हस्टोरीसुद्धा तितकीच मजेशीर आहे. सोहा अली खान आणि कुणालच्या लव्ह स्टोरीबद्दल एक खास किस्सा समोर आला आहे.
https://www.instagram.com/tv/B7ukAOJntdl/?utm_source=ig_web_copy_link
कुणाल आणि सोहा सर्वप्रथम ‘ढूँडते रह जाओगे’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान भेटले होते. मात्र त्यावेळी या दोघांमध्ये जास्त बोलण झाल नाही. त्यानंतर त्यांची ‘९९ ‘ या चित्रपटाच्या सेटवर पुन्हा भेट झाली आणि पहिल्यांदा सोहा अली खानला कुणालबद्दल ओढ निर्माण झाली. त्यानंतर त्यांच्यात संवाद सुरु झाला आणि हळूहळू दोघही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अखेर कुणालने सोहाला प्रपोज केलं.
तर दुसरीकडे लग्नापूर्वी सोहाने कुणालवर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी स्वतः स्वयंपाक करण्याचा निर्णय घेतला होता. सोहाला स्वयंपाक अजिबात करता येत नाही. सोहा तर कधी किचनमध्ये सुद्धा गेली नव्हती. तरीही तिने स्वयंपाक केला पण तिने पूर्ण स्वयंपाक करपवून ठेवला होता. तरीसुद्धा कुणालने ते अगदी प्रेमाने खाल्लं होतं. सोहाने कुणाल आणि तिच्या नात्यासाठी पहिल्यांदा आईलाच तयार केल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू आणि अभिनेत्री सोहा अली खान यांनी २०१५ लग्न केले. या दोघांना इनाया ही २ वर्षांची मुलगीसुद्धा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- धनगर आरक्षणाचा प्रश्नही पेटणार! ३१ मे रोजी ‘जागर’ करण्याचे गोपीचंद पडळकरांचे आवाहन
- ‘..तेव्हा आम्ही संपूर्ण राजभवनला पेढे वाटू’, संजय राऊतांची मार्मिक प्रतिक्रिया
- ‘प्रियंका, कंगनाला भेटणाऱ्या मोदींना संभाजीराजेंना भेटायला वेळ नाही’
- दिलासा! म्यूकरमायकोसिसवरील उपचार सरकारी योजनेतूनच होणार
- आकडेवारी जाहीर ; देशात आतापर्यंत तब्बल ‘इतक्या’ लोकांचे झाले लसीकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
