Share

बॉम्ब कुठेय विचारत धनंजय मुंडेंनी विधानसभेत दंड थोपाटले; विरोधकांना केले आवाहन

Published On: 

 

मुंबईः आज विधानसभेत  मंत्री जयंत पाटील विदर्भ पाटबंधारे महामंडळाविषयी बोलत होते. बोलत असताना  मागे बसलेल्या धनंजय मुंडेंकडे कॅमेराने जास्त लक्ष वेधले. धनंजय मुंडे कुणाला तरी उद्देशून, हातवारे करून काही तरी विचारत होते. हातवारे बोलके असल्यामुळे, त्यांचा प्रश्न लगेच लक्षात आला व यावर आपापसात चांगलीच चर्चा सुरु झाली.

‘विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सभागृहात बॉम्ब फोडणार होते, काय झालं? बॉम्ब कुठंय, असा प्रश्न धनंजय मुंडे विचारत होते. धनंजय मुंडे यांनी हातवारे करून विचारलेल्या या प्रश्नामुळे ते चांगलेच चर्चेत आहेत . देवेंद्र फडणवीस यांनी मागील आठवड्यात सत्ताधाऱ्यांवर आरोप करणारा व्हिडिओ बॉम्ब विधानसभेत सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. आठवड्याच्या अखेरीस देवेंद्र फडणवीस यांना मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले, त्यामुळेही राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

त्यानंतरही आगामी आठवड्यात आणखी बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी दिला होता. त्यामुळे विधानसभेत देवेंद्र फडणवीस आज काय बोलतात, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. मात्र फडणवीस यांनी आज अगदी काही मिनिटंच घेतले आणि ते खाली बसले. त्यानंतर मात्र सभागृहात विरोधी पक्षांचा बॉम्ब कुठे आहे, कधी पडणार? असे प्रश्न खाणाखुणांनी विचारला जाऊ लागला.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!