🕒 1 min read
बीड: जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यात नेहमीच वाद-विवाद होत असतात. आता पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद सुरू झाला आहे. बीड जिल्ह्यात माफिया राज बोकाळला असल्याचा अजून कोणता पुरावा पाहिजे आहे असा सवाल करत भाजप नेत्या पंकजा मुंडे (bjp pankaja munde) यांनी पालकमंत्री धनंजय मुडेंवर (dhananjay munde) निशाणा साधला होता. पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अंबाजोगाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुमार कोकणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर देण्याची मागणी केली आहे. धमक्या देऊन आणि धारदार शस्त्रांचा धाक दाखवून बिलांवर सह्या करण्यात येत असल्याचा अनागोंदी प्रकार बीडमध्ये समोर आला आहे. यावरून पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे.
पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधत धनंजय मुंडे म्हणाले, ज्याला त्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे. व्यक्त होणं संदर्भातील अधिकार आहेत. ते संविधानाने दिलेले आहेत. अशा पद्धतीची घटना समोर आल्यानंतर आणि माध्यमांनी ब्रेकिंग केल्यानंतर सत्ता पक्षाच्या विरोधात एखादी संधी मिळाली तर ती संधी घेऊन त्या ठिकाणी आपलं मत बोलले जाते. पण जिल्ह्याची बदनामी होते, अशावेळी सगळ्याच राजकीय पक्षांनी व नेत्यांनी आपण ज्या भूमीत जन्मला आलो त्या भूमीच्या बाबतीत काय लिहावं काय बोलावं या बाबतीत विचार केला पाहिजे, अशा शब्दात पंकजा मुंडे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- धक्कादायक! औरंगाबाद जिल्ह्यातील १२२ गावांमध्ये अजूनही नळ नाही..
- रोहित शर्माचा नवा लूक पाहून तुम्हीही व्हाल हैराण; चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव
- भारत-चीन प्रश्नी लष्कर प्रमुख म्हणाले, ‘युद्ध करायची वेळ आलीच तर…’
- औरंगाबादेतील गर्दीला ‘लक्ष्य’ करणार जिल्हाधिकार्यांनी स्थापन केलेली भरारी पथके..!
- ‘टेकफॉग अॅपचा विरोधकांविरुद्ध वापर करणाऱ्या भाजपवर कारवाई करा’; सतेज पाटलांची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
