🕒 1 min read
मुंबई : करुणा शर्मां यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांनी डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला होता. करुणा शर्मा यांनी सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते. त्यामध्ये त्या स्वतःधनंजय मुंडे आणि त्यांच्या दोन मुलांचे फोटो होते. त्यामुळे धनंजय मुंडेंनी कोर्टात धाव घेतली होती. आपले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट न करण्याचे निर्देश करुणा शर्मांना देण्याची विनंती केली होती.
नुकतेच करुणा यांची बहिण रेणू शर्मा यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्यावर अत्याचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडियावर वाच्यता केली होती. धनंजय मुंडे यांना लिव्ह-इन पार्टनर करुणा शर्मांपासून दोन मुलं आहेत. त्यांच्यासोबत असलेले वाद सोडवण्यासाठी मध्यस्थ नियुक्त करण्यात आला आहे.
दोघांनीही वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले. अटी आणि शर्तींची पूर्तता बाकी आहे. मध्यस्थीचा खर्च धनंजय मुंडे करणार आहेत. धनंजय मुंडे यांनी करुणांकडून नुकसानभरपाईची मागणी केली होती. धनंजय मुंडे यांचे वकील शार्दुल सिंग आणि करुणा शर्मा यांचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थाची नियुक्ती झाली असून दोघांनाही त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत.
रेणू शर्मा यांनी अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली होती. यामुळे धनंजय मुंडे अडचणीत आले होते. मात्र, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ठाम उभा राहिले असल्याने धनंजय मुंडे यांना अभय मिळणार हे स्पष्ट झाले होते.
महत्वाच्या बातम्या
- अण्णा हजारे उपोषणावर ठाम; उपोषण थांबवण्यासाठी आज केंद्रीय मंत्री राळेगणसिद्धीत…
- बुढीलेन भागात रात्री गोळीबार; आरोपी फरारी
- ‘जसप्रीत बुमराह विरुद्ध रणनीती आखणे कठीण जाते’; इंग्लंडच्या सलामीवीराची प्रतिक्रिया
- अर्थसंकल्पात प्राप्तिकर करदात्यांना मिळू शकतो दिलासा !
- विरोधकांचे नकारात्मक राजकारण सुरूच; राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

