Share

सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, काय आहे नेमकं प्रकरण?

Published On: 

नवी दिल्ली :  गायक सिद्धू मुसेवाला याची भरदिवसा निर्घृण हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य असलेल्या लकीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. या हत्येप्रकरणी मोठा खुलासा झाला आहे. सिद्धूच्या हत्येचा कट अन्य कुठेही नसून दिल्लीच्या तिहार तुरुंगात रचण्यात आला होता. लॉरेन्स बिश्नोई यांनी गोल्डी ब्रारशी परदेशात व्हर्च्युअल नंबरद्वारे अनेकदा बोलले होते. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमान खान याची देखील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

तिहार जेलमध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईने काही दिवसांपूर्वी सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. यामुळे सलमान खानच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे. माहितीनुसार वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणाले, “आम्ही सलमान खानची सुरक्षा वाढवली आहे. त्याच्या अपार्टमेंटमध्ये देखील पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. जेणेकरून त्याच्यावर कोणताच हल्ला होऊ नये.”

माहितीनुसार, २०१८ मध्ये काळवीट शिकार प्रकरणाच्या वेळी लॉरेन्स बिश्नोईने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. बिश्नोई समाजामध्ये काळवीट खूप पवित्र मानले जाते. म्हणून या समाजानेच काळवीट शिकार प्रकरणात सलमान खान विरोधात खटला दाखल केला होता. दरम्यान लॉरेन्स बिश्नोई दिल्ली येथे तुरुंगात आहे. पण तरीसुद्धा सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर त्याची चौकशी करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!