मुंबई : प्रसिद्ध गायक केके यांनी मंगळवारी रात्री या जगाचा निरोप घेतला. वयाच्या ५३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. तो कोलकात्यात लाइव्ह शो करत होता. शो संपल्यानंतर त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो हॉटेलवर गेला. तसा तो कोसळला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. कोलकाता मेडिकल रिसर्च इंस्टीट्यूट येथे नेण्यात आले. यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्रसिद्ध गायकाच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. ही बातमी रात्री उशिरा समोर येताच ज्या कोणी ऐकली तो स्तब्ध झाला. बॉलीवूडपासून ते त्यांच्या प्रियजनांपर्यंत सर्वजण त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. केके यांच्या निधनामुळे केवळ बॉलिवूडच नाही तर क्रिकेट विश्वालाही धक्का बसला आहे. त्यांच्या निधनावर भारतीय संघातील स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच काही माजी भारतीय खेळाडूंनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने लिहिले की, “आम्ही आमच्या काळातील एक महान गायक गमावला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या लोकांप्रती सद्भावना आहे.”
Lost a magnificent singer of our times and so suddenly. Condolences to his family and close ones. #KK????
— Virat Kohli (@imVkohli) June 1, 2022
भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने लिहिले की, “अतिशय प्रतिभावान आणि अष्टपैलू गायक के.के. यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.”
Disheartened by the death of a very talented and versatile singer KK. May god bless his soul.#RIPKK ????????
— Mohammad Kaif (@MohammadKaif) May 31, 2022
आकाश चोप्रानेही केके यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.
“केके यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. पल…याद आएंगे वो पल. हे इतके भयानक वर्ष गेले…बरेच चांगले लोक खूप लवकर गेले. तुमच्या गाण्यांद्वारे तुम्ही आमच्या हृदयात जिवंत राहाल.”
Deeply saddened to hear about KK’s untimely demise. Pal…yaad aayenge woh pal. It’s been such a dreadful year…too many good people gone too soon. May your soul R.I.P.
You’ll continue to live in our hearts through your songs…forever.— Aakash Chopra (@cricketaakash) June 1, 2022
महत्वाच्या बातम्या:

