पुणे : संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढायची तयारी दर्शविली होती. मात्र, कोणत्याच पक्षाने पाठिंबा न दिल्यामुळे त्यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत शिवसेनेच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली होती.
याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना सल्ला दिला आहे. संजय राऊत पुण्यात बोलत होते.