Share

आता एमआयएमने दिला राष्ट्रवादीला धक्का, नेत्याला प्रवेश देत जाहीर केली उमेदवारी

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये दुसऱ्या पक्षातील नेत्यांना फोडण्याची शर्यत सुरु आहे. सत्ताधारी भाजप व शिवसेनेकडून कॉंग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांना गळाला लावण्यात येत आहे. आता वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या एमआयएमने राष्ट्रवादी कॉंग्रेसला धक्का दिला आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत असणारी आघाडी एमआयएमकडून तोडण्यात आली आहे. तसेच विधानसभेसाठी उमेदवारांची पाहिली यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मालेगाव मध्य मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते मौलाना मुफ्ती इस्माईल यांना एमआयएमकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे इस्माईल यांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे.

समाधानकारक जागा न मिळाल्याने एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांनी वंचित बहुजन आघाडीकडून बाहेर पडण्याचा निर्णय घोषित केला होता. परंतु प्रकाश आंबेडकर यांनी खा. असदुद्दीन ओवैसी जोपर्यंत जाहीर करत नाहीत तोपर्यंत आपली आघाडी कायम असल्याचं सांगितले होते. आता ओवैसी यांनी जलील यांनी घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे.

एमआयएमकडून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल लांडगे, नांदेड उत्तर मधून मोहम्मद फेरोज खान लाला यांना तर मालेगाव मध्य मुफ्ती मोहंमद इस्माईल यांना विधानसभेसाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!