Share

बहिण-भावाच्या नात्यातील दुरावा कमी करण्यासाठी दोन पावलं पुढ येण्यास तयार – धनंजय मुंडे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील असलेला दुरावा आणि राजकीय द्वंद्व महाराष्ट्राला काही नवीन नाही. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हे दोन बडे नेते आणि बहिण भाऊ अनेकवेळा एकाच मंचावर पहायला मिळाले आहेत.

आता धनंजय मुंडे पुन्हा एकदा आपल्या याच बहिण भावाच्या नात्यावर भावनिक भाष्य केल आहे. ”नात्यातला दुरावा मिटण्यासाठी दोन्ही बाजूने त्या पद्धतीचा संवाद लागतो. नात्यातला दुरावा मिटावा यासाठी घरातला मोठा व्यक्ती म्हणून माझे दोन पाऊलं कधीही पुढे असेल.” अस धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.

“राजकारणात राजकारण त्याच्या ठिकाणी आणि नातं दुसऱ्या ठिकाणी असं असतं. संवाद जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत नात्यामध्ये चांगले संबंध निर्माण होत नाही. स्थानिक पातळीपासून एकमेकांना विरोध आहे. याचा परिणाम नात्यावर होऊ नये असं वाटत होतं. पण परिणाम एवढे झालेत की त्याला काहीही करु शकत नाही,” अस देखील धनंजय मुंडे म्हणाले आहेत.

आता यावर धनंजय मुंडे यांच्या भगिनी आणि राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडून कसा प्रतिसाद येतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!