मुंबई : भाजपाच्या मिशन लोकसभा घोषणेनंतर निवडणुकांना आवधी असतानाही राजकीय वातावरण ढवळाढवळ होताना दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई महापालिकेबाबत पदाधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांचा परिणाम लोकसभा निवडणूकांवरही दिसू लागला आहे.याच पाश्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.
धनंजय मुंडे यांचा भाजप पक्षावर निशाणाः
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात केंद्रीय मंत्री काय आणखी कोणी आलं तरी त्याचा फरक थेट मतदानावर होणार नसल्याचा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. शिवाय राज्य सरकार हेच अल्पावधीसाठीच आहे. नियम डावलून सत्तेत बसलेलं हे सरकार अधिक काळ टिकणार नसल्याचेंही धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे.
निवडणूकांपूर्वी भाजपाकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जातोः
निवडणूकांपूर्वी भाजपाकडून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यातील वातावरण बदलून टाकण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र, ज्या विभागात गेल्या 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादी कॉंग्रसने जनतेची सेवा केली आहे, त्या बालेकिल्ल्यात बदल हा सहज शक्य राहणार नसल्याचं मुंडेंनी म्हटलं आहे.
बारामती, पुणे, पिंपरी चिंचवड या ठिकाणी तर भाजपाच्या कित्येक पिढ्या गेल्या तरी त्यांना अपेक्षित बदल होणार नाही. कारण या मतदारसंघात झालेली कामे बोलत आहेत. बारामती मतदार संघामध्ये यापूर्वीच भाजपाचे डिपॉझिट जप्त झालं होतं, त्याचा विसर त्यांना पडला असेल असा टोलाही धनंजय मुंडे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Radhakrishna Vikhe Patil | “राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा सोडून काँग्रेस छोडो…”, राधाकृष्ण विखे पाटलांचा हल्लाबोल
- Ravi Rana | गणपतीनंतर पोलीस आयुक्त आरती सिंग यांची उचलबांगडी होणार – रवी राणा
- Ashish Shelar | एकनाथ शिंदे यांना दाबण्याचे काम पेंग्विन सेनेने केलं – आशिष शेलार
- Subhash Wankhede | “नवनीत राणा या मोदी आणि भाजपच्या अंधभक्त”
- NCP । पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय, काळू बाळूंनी बारामतीत जाऊन…; राष्ट्रवादीचा हल्लाबोल


