Share

धनंजय मुंडेंनी तोफ पुन्हा धडाडणार ; धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत घेणार नऊ प्रचारसभा !

Published On: 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळख असलेले नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे हे धुळे जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकीत विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ तब्बल नऊ प्रचार सभा घेणार असून आज दि. ०४ व उद्या ०५ रोजी धुळे जिल्ह्यातील विविध ठिकाणी या प्रचारसभांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंची तोफ धडाडणार आहे.

मुंडेंनी राज्यभरात लोकसभा निवडणुकीत ८० तर विधानसभा निवडणुकीत स्वतःचा गड राखत तब्बल ४० प्रचारसभा घेतल्या होत्या. आपल्या जबरदस्त भाषणशैलीतून विरोधकांवर अचूक वार करत घायाळ करणाऱ्या मुंडेंच्या प्रचार सभेची राज्यात सर्वत्र मागणी असते. त्यामुळे आघाडीचा उमेदवार म्हटलं की मुंडेंच्या सभेची मागणी हे जणू आता समीकरणच बनले आहे !

दरम्यान आज धनंजय मुंडे हे बीड येथून धुळ्यातील होळनाथ ता. शिरपूर येथे सायंकाळी ४:३० वाजता होणाऱ्या सभेस उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर रात्री ८:०० वाजता बोटावद ता. शिंदखेडा येथेही प्रचारसभा घेणार आहेत. तर उद्या दि. ०५ रोजी सकाळी १०:०० वा. विखरण ता. शिंदखेडा, दुपारी १२:०० वा. जैताणे ता. साक्री, दुपारी २:०० वा. धाडणे ता. साक्री, ३:०० वा. वळसाने ता. साक्री, सायंकाळी ६:०० वा. कुसुमबा ता. धुळे व रात्री ८:०० वा. आर्वी ता. धुळे अशा 6 ठिकाणी ते प्रचारसभांना उपस्थित राहतील.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!