Share

लवकरच ‘धकधक गर्ल’ दिसणार डिजिटल प्लॅटफॉर्मवर

Published On: 

मुंबई : देशात कोरोनाचे संकट वाढल्याने सरकारकडून  काही नियम लागू करण्यात आले आहे. यामुळे अनेक क्षेत्राना अडचणीचा सामना करावा लागला आहे. यातील एक म्हणजे मनोरंजन क्षेत्र. कोरोनामुळे चित्रपटगृह बंद असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यास अडचणी आल्या आहेत. मात्र यावर पर्याय म्हणून अनेक सुपरस्टार्स  डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत. यात आता माधुरी दीक्षित देखील तिच्या नवीन इनिंगसाठी सज्ज झाली आहे.

माधुरी दीक्षित करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्वात पदार्पण करणार आहे. करण जोहरची डिजिटल कंटेंट प्रोडक्शन कंपनी माधुरी दीक्षितसोबत एक नवी वेब सीरीज बनवत आहे. बिजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली या सीरीजचे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेचे नाव खूप खास असणार आहे. माधुरी दीक्षितची ही वेब सीरीज ‘फॅमिली ड्रामा’ असणार आहे. ‘दीवार’ चित्रपटाच्या ‘मेरे पास माँ है’ या संवादातून त्याचे नाव ठेवण्यात येणार आहे. नावाप्रमाणेच ही सीरीज देखील विशेष असणार आहे.

माधुरी दीक्षितची ही नवी सीरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होईल. माधुरी ही एक अभिनेत्री आहे, जी नेहमीच वादापासून दूर राहते. आता वयाच्या ५४ व्या वर्षी ती पहिली वेब फिल्म करून नवी इनिंग सुरु करणार आहे. बॉलिवूडची धकधक गर्लला डिजिटल विश्वात पाहण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!