सातारा : राज्यात सध्या मराठा,ओबीसी,धनगर आदी समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात पडसाद उमटताना दिसत आहेत. यातच आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर येताच ओबीसी समाजाचे सर्व मंत्री एकत्र आल्याचं दिसून आलं. इतकंच नाही तर ओबीसी समाजाच्या शिबिरामध्ये ओबीसी समाजाचे सत्तेतील आणि विरोधी नेते देखील एकत्र आले होते.
मराठा आरक्षणाबाबत मत याच्या विरोधी चित्र दिसत आहेत. मराठा समाजातील मंत्री हे केवळ बघ्याची भूमिका घेत असून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या नेत्यांमध्ये देखील काही गट निर्माण झाल्याचं समोर आलं आहे. यावर आता शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी भाष्य केलं आहे. ते साताऱ्यात बोलत होते.
‘ओबीसी समाजाचे नेते आणि आमदार ओबीसी आरक्षणासाठी एकत्र येवू शकतात, मग मराठा समाजातील नेते, लोक प्रतिनिधी मराठा आरक्षणासाठी का एकत्र येऊ शकत नाही ?’ असा सवाल विनायक मेटे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत बोलताना उपस्थित केला आहे. पुढे त्यांनी मराठा आमदारांना एकत्र घेऊन बैठक घेणार असून या बैठकीत रस्त्यावरच्या लढाईबाबत निर्णय घेतला जाईल असं जाहीर केलं आहे.
यासोबतच, मराठा समाजातील मुलांना सहानुभुती द्यायची सोडून मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जागचे हललेले नाहीत. मराठा समाजातील लोकांना वेड्यात काढायचं काम सध्या राज्य सरकार कडून सुरू असल्याचा आरोप देखील मेटे यांनी करत राज्य सरकारवर निशाणा साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अमित शाहांना पत्र लिहितोय, आता एक-एक नाव समोर येईल’; जरंडेश्वर जप्तीवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- पायी वारीचा मुद्दा चिघळला; बंडातात्या कराडकर यांना दिसता क्षणीच अटक करण्याचे आदेश
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीकडे ‘मविआ’ने संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहण्याची गरज
- बाप रे! बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांकाला एका पोस्टसाठी मिळतं एवढे मानधन
- अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर कारखाना लाटला; शालिनीताई पाटलांचा गंभीर आरोप


