पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशासह राज्यभर थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यभर अनेक ठिकाणी कडक निर्बंध लागू आहेत. धार्मिक कार्यक्रमांना मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. याचाच परिणाम आता महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळ्यावर देखील झाला आहे.
महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेला आषाढी वारी सोहळा यंदाच्या वर्षीही करोनाच्या सावटाखालीच साजरा होणार आहे. यंदा वारीसाठी केवळ १० पालख्यांनाच परवानगी देण्यात आली आहे. तर पायी वारीला परवानगी देण्यात आली नाहीये. यासोबतच, हा निर्णय संस्थानांनी नाईलाजाने स्विकारला असला तरी तो वारकरी संप्रदायाला मान्य नाही. अनेक वारकरी संघटनांनी पायीच वारी करण्याचा इशारा दिला आहे. पायी वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे राज्य सरकारने नियमावली आखून कोरोना नियमांच्या पालनासह पायी वारीला परवानगी द्यावी अशी मागणी काही वारकरी संघटनांसह भाजपने केली आहे.
वारकरी संप्रदायातील बंडातात्या कराडकर यांनी वारकऱ्यांनी पायी वारी करावी असं म्हटलं होतं. यामुळे वारकरी दाखल होण्याची शक्यता असून परवानगी नसल्याने गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणू देहूसह आळंदीमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले असून बाहेरील व्यक्तींना प्रवेश देखील दिला जात नाहीये.
अशातच, कराडकर यांचा आळंदी भागातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामुळे त्यांना दिसताच क्षणी ताब्यात घेण्याच्या सूचना पोलीसांना सूचना करण्यात आल्या आहेत. आळंदी आणि परिसरातील पोलीसांना पिंपरी चिंचवड आयुक्तालयातुन बिनतारी(वायरलेस) संदेशावरून सुचना करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अमित शाहांना पत्र लिहितोय, आता एक-एक नाव समोर येईल’; जरंडेश्वर जप्तीवर चंद्रकांतदादांची प्रतिक्रिया
- मोठी बातमी : भारत दौऱ्यापूर्वी श्रीलंका क्रिकेट टीममधून 5 खेळाडूंची माघार
- विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूकीकडे ‘मविआ’ने संकट म्हणून नव्हे तर एक संधी म्हणून पाहण्याची गरज
- बाप रे! बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांकाला एका पोस्टसाठी मिळतं एवढे मानधन
- अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करून जरंडेश्वर कारखाना लाटला; शालिनीताई पाटलांचा गंभीर आरोप


