Share

‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडने घेतला लसीचा पहिला डोस ; कॅप्शनने वेधले लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात लस ही महत्त्वाची अस्त्र झाली आहे. त्यामुळे लसीकरणावर अधिक भर दिला जात आहे. 21 जूनपासून देशातील प्रत्येकासाठी कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. यानंतर सिनेकलाकारांनी देखील लस घेत नागरिकांनाही लस घेण्याचे आवाहन केले.

यातच नुकताच स्टार प्रवाह मालिकेतील ‘देवमाणूस’ फेम अभिनेता किरण गायकवाडनेही लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोशल मीडियावरून एक पोस्ट शेअर करत त्याने याबद्दलची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक संदेख देखील दिला आहे. त्याने दिलेला हा संदेश सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. त्याने इंस्टाग्रामवर दिलेल्या कॅपशनने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

https://www.instagram.com/p/CQ-lAfbNEc5/?utm_source=ig_web_copy_link

लस घेतानाचा फोटो शेअर करत किरणने फोटोला कॅप्शन देत म्हटलं आहे की, ‘आपण किती जरी मॅनेज करायचा प्रयत्न केला,तरी कोरोना मॅनेज करू देणार नाही, म्हणून आज लस घेतली,…तुम्हीही घ्या’. त्याच्या या कॅप्शनची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. तसेच त्याच्या या कॅप्शनचे  कौतुक देखील होत आहे. तसेच त्याने काळजी घेण्याचं आवाहनसुद्धा करत केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!