Share

महाविकास आघाडीतुन काँग्रेस सर्वप्रथम बाहेर पडेल : केंद्रीय मंत्री रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

नांदेड : महाविकास आघाडीतील मंत्र्याच्या बलात्कार व इतर प्रकरणामुळे या सरकारची प्रतिमा दिवसेंदिवस मलीन होत चालली आहे. अशा प्रकारामुळे तीन पायाचे हे सरकार जास्त काळ टिकणार असे वाटत नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडणारा पहीला पक्ष हा काँग्रेस असेल. असे केंद्रीय सामाजीक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. नांदेड येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्य सरकारमधील धनंजय मुंडे, संजय राठोड या मंत्र्याच्या प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा मलीन होत आहे. तसेच पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज आहे. अशी मागणी रामदास आठवले यांनी केली. परंतु अशा प्रकरणामुळे तीन पायांचे हे महाविकास आघाडी सरकार जास्त काळ टिकेल असे वाटत नाही. सत्तेत जर काँग्रेसला न्याय मिळत नसेल तर त्यांनी लगेच बाहेर पडावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

काँग्रेसनेही आता नाना पटोले यांच्यासारख्या आक्रमक नेत्याला प्रदेशाध्यक्ष केले आहे. ते कुणालाही भीक घालणारे नाहीत. यामुळे जर या सरकारमधून काँग्रेसच सर्वप्रथम बाहेर पडेल अशी भविष्यवाणीही रामदास आठवले यांनी केली. शिवसेनेचा वाघ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकल्याने उद्धव ठाकरे हे सध्या मवाळ झाले आहेत. यामुळे त्यांना अनेक निर्णयांत त्यांना तडजोड करवी लागते. परंतु अजूनही वेळ गेली नाही, बॅक टू पॅव्हेलियन या, असा सल्ला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!