मुंबई : कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या काळात आर्थिक दुर्बल घटकांना याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांना दिलासा देणारे ५ हजार ४७६ कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. राज्यात बुधवार दि १४ एप्रिल २०२१ पासून रात्री ८ वाजेपासून १ मे २०२१ पर्यंत हे कडक निर्बंध लागू राहतील व या काळात संपूर्ण संचारबंदी राहील. केवळ आवश्यक सेवा सुविधा सुरु राहतील. यासंदर्भातील ब्रेक दि चेनचे नवे आदेश प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
राज्यात मार्च २०२१ पासून कोविड-१९ ची दुसरी लाट आली असून या लाटेमध्ये बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. रुग्णांची संख्या कमी करण्याची गरज म्हणून कडट टाळेबंदी लागू करण्यात येत आहे. पण या काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी अन्नधान्य आणि आर्थिक सहाय करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संकटाचा मुकाबला करताना शासन गरजूंच्या पाठिशी उभे आहे. याकाळात कुणाचीही आबाळ होऊ देणार नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या पॅकेजवर विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. आमची अपेक्षा अशी होती की लॉकडाऊन किंवा कठोर निर्बंध सरकार लावणार असेल तर विविध घटकांना सरकारने मदत केली पाहिजे. मात्र ठाकरे सरकारने जाहीर केलेलं 5 हजार 300 कोटींचं पॅकेज निव्वळ धूळफेक आहे अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली आहे.
3300 कोटींची जी तरतूद सांगण्यात आली आहे ती सर्वसाधारण बजेटमधली वर्षभरात केली जाणारी तरतूद आहे. आत्ताच्या वाढणाऱ्या कोरोनासाठी हे 3300 कोटी दिलेले नाहीत. किती बेड्स वाढवणार? किती व्हेटिंलेटर्स वाढवणार? याची माहिती सरकारकडून अपेक्षित होती. मात्र ती कोणतीही स्पष्टता सरकारने दिलेली नाही. असे फडणवीस म्हणाले.
दरम्यान, अनेक घटकांना सरकारने मदत केलेली नाही. शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार, फुलवाले, केशकर्तनालय चालवणारे दुकानदार, छोटे उद्योग चालवणारे लोक हे सगळे मदतीपासून वंचित राहिलेले आहेत. जी मदत देतो आहे हे सांगण्यात आलं त्यात इतकी धूळफेक आहे की विचारता सोय नाही. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘कुंभ आणि मरकजमध्ये कोणतीही तुलना होता कामा नये’
- १४ एप्रिलला लॉकडाऊन लावल्याने आठवलेंनी व्यक्त केली नाराजी
- फलंदाजीत अपयश आले तरी आंद्रे रसेलने केला गोलंदाजीत मोठा पराक्रम
- रेमडेसिव्हिर कोरोनावर प्रभावी नाहीच, डब्ल्यूएचओचा पुनरुच्चार
- कोरोनाची लक्षणे दिसू लागताच घाबरलेल्या कामगाराने गळफास घेऊन आयुष्य संपविले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

