नवी दिल्ली : भारतात कोरोनासाठी रेमडेसिविर इंजेक्शनचा सर्रास वापर करण्यात येत आहे. यामुळे अनेक ठिकाणी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्रात तर प्रशासनाने तर रेमडेसिविर इंजेक्शनबाबत सगळी सुत्रे आपल्या हातात घेतली आहे. पण याच दरम्यान आता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंगळवारी पुन्हा एकदा रेमडेसिवीर कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचे कोणतेही वैद्यकीय पुरावे अस्तित्वात नसल्याचा पुनरुच्चार केला.
‘कोरोनामुळे होणारे मृत्यू व रुग्णांचा व्हेंटिलेशनचा कालावधी कमी करण्यासाठी रेमडेसिवीरची कोणतीही मदत होत नाही, हे नुकत्याच करण्यात आलेल्या चाचण्यांद्वारे स्पष्ट झाले आहे,’ असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य संशोधक डॉक्टर सौम्या स्वामिनाथन व डॉक्टर मारिया वॅन केरखोव यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले. ‘डब्ल्यूएचओ’ने यापूर्वीच हे औषध कोरोनावर परिणामकारक नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही भारतासह जगभरातील अनेक देशांत हे औषध कोरोनावर उपाय म्हणून वापरले जात आहे.
‘रेमडेसिवीरच्या उपयुक्ततेविषयी आतापर्यंत ५ वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. त्यात रुग्णालयांत दाखल रुग्णांना रेमडेसिवीर दिल्यानंतर मृत्युदरात घट झाल्याचे किंवा त्यांच्या रुग्णालयातील कालावधीत घट झाल्याचे अथवा कोरोनावर हे औषध परिणामकारक असल्याचे कोणतेच पुरावे आढळले नाही,’ असे स्वामिनाथन म्हणाल्या. तर डॉक्टर मारिया यांनी पुरावे नसतानाही या औषधीचा कोरोना रुग्णांवर सशर्त वापर करण्याची शिफारस करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ‘पुराव्यांचा अभाव असला तरी रेमडेसिवीरमुळे रुग्णांच्या प्रकृतीत काहीअंशी सुधारणा होते. त्यामुळे आम्ही त्याचा सशर्त वापर करण्याची शिफारस केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
- कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास अंमलबजावणी संचलनालयाकडे जाणार…
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर सीबीआय समोर हजर, चौकशी सुरु
- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुडिजच्या अंदाजामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला दिलासा
- कोरोनाचा कहर : उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान आज विविध राज्यांच्या राज्यपालांशी संवाद साधणार
- ‘माझी मैना गावावर राहिली’, अण्णाभाऊंच्या गीताचे विडंबन; अजय-अतुल विरोधात परभणीत तक्रार

