Share

कोरोनाची लक्षणे दिसू लागताच घाबरलेल्या कामगाराने गळफास घेऊन आयुष्य संपविले

Published On: 

सातारा – साताऱ्याच्या कराडमध्ये कोरोनाची लक्षणे असलेल्या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्वे नाका इथे ही घटना घडली. घरातील दोन जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले होते. तर संबंधित 36 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लक्षणे दिसू लागली होती. कोरोनाची लक्षणे असल्याचं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या तरुणाने घराबाहेर झाडाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण छत्तीसगड येथील असून तो बांधकाम कामगार होता. गोविंद परशाराम साहू (वय 45, रा. कार्वे नाका, मूळ रा. छत्तीसगड) असे मृताचे नाव आहे. कार्वे नाका परिसरातील एका कॉम्प्लेक्स इमारतीशेजारील झाडाला गळफास लावून त्याने आत्महत्या केली.

पोलिसांनी सांगितले की, गोविंद साहू हा आठ दिवसांपूर्वी ते गावाहून कऱ्हाडला परत आला होता. तीन दिवसांपूर्वी त्याला ताप आला व अंग दुखू लागले. त्याने खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना कोविड टेस्ट करून घेण्यास सांगितले होते. तोपर्यंत साहूची मुलगी, मुलगा व पत्नीलाही त्रास सुरू झाला. या प्रकाराने तो घाबरला आणि यातून त्याने आयुष्य संपविण्याचे टोकाचे पाऊल उचलले.

कोविड नियमानुसार त्याच्यावर कराड नगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोविड स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. गोविंद साहूच्या मुलीलाही ताप आणि कोरोनासदृश्य लक्षणे असल्याने आरोग्य विभागाने त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलाला चाचणी करण्यासाठी रुग्णालयात पाठवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!