Share

१४ एप्रिलला लॉकडाऊन लावल्याने आठवलेंनी व्यक्त केली नाराजी

Published On: 

मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे १४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजल्यापासून राज्यात कडक संचारबंदी लावण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत सोशल मीडियावर घोषणा केली. मात्र, आंबेडकर जयंतीच्या दिवशीच राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या बाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

राज्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढत राहिल्यास आरोग्य यंत्रणा कमी पडू शकते. त्यामुळे सध्या लॉकडाऊन लावण्याशिवाय पर्याय नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन लावता आले असते, असे म्हणत आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत आठवले यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशीच राज्यात लॉकडाऊन लावल्यामुळे आंबेडकरी जनतेत गैरसमज आणि नाराजी आहे. दि.१४ एप्रिल ऐवजी १५ एप्रिलला जरी लॉकडाऊन लावला असता तर फार उशीर नसता झाला. १४ एप्रिलला लॉकडाऊन लावण्याबाबत नाराजी आहे.’

राज्यात गेल्या आठ दिवसांपासून ‘ब्रेक द चेन’ नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सर्व दुकाने आधीपासूनच बंद आहेत. त्यातच आता कलम १४४ म्हणजेच दिवसभराची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही नियमावली एक दिवस उशीरा लागू करता आली असती, असे आठवले यांनी यात म्हटले आहे.

आठवले म्हणाले की,  ‘कोरोना चा प्रसार होऊ नये यासाठी आंबेडकरी जनता सर्व निर्बंध नियम पाळत आहे.गेल्या वर्षी ही डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही शांततेत साजरी केली. यावर्षी ही कोरोना बाबतचे निर्बंध आंबेडकरी जनता पाळत आहे. मात्र लॉकडाऊन मुख्यमंत्र्यांनी नेमका १४ एप्रिल भीम जयंतीलाच का जाहीर केला?’

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!