Share

‘आमची घोषणा होती ‘हरघर मोदी घरघर मोदी’ तुम्ही कॉपी केली; ‘हरघर गोठे घरघर गोठे’ काहीतरी कल्पकता वापरा’

Published On: 

मुंबई : दोन दिवसीय हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनात झालेल्या सत्रात बोलत असताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहर केला आहे. वर्षपूर्ती निमित्त सरकारने प्रकाशित केलेल्या पुस्तकातील योजनांवरून फडणवीस यांनी सरकारला चांगलच फैलावर घेतलं आहे.

तुमच्या पुस्तकात आमचीच कामं का? असा सवाल फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केला आहे. आमच्या योजनांची नावं बदलून तेच पुढे नेलं जातंय, आमची घोषणा होती हरघर मोदी, घरघर मोदी, त्याची कॉपी ग्राम विकास विभागाने केली, हरघर गोठे, घरघर गोठे, तुम्ही काहीतरी कल्पकता वापरा, आमचं कशाला कॉपी करताय? अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

तर, जलयुक्त शिवार योजना तुम्ही बंद केली, खुशाल करा. जलयुक्त शिवारच्या चौकशीचे आदेश आपल्या खुर्चीवर मी बसलो होतो तेव्हाच दिले होते. तुम्ही खुशाल या योजनेची चौकशी करा या योजनेशी संबंधित ७०० तक्रारी आल्या होत्या. तुम्ही त्यावर बोला आणि ५ हजार गावांचं कसं भलं झालं तो कार्यक्रम सादर करतो असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!