Share

शेतकरी कायद्याबाबतची शरद पवारांची भूमिका आश्चर्यकारक- चित्रा वाघ

Published On: 

मुंबई:- दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 20वा दिवस आहे. मात्र, अद्यापही कृषी कायद्याबाबत तोडगा निघू शकला नाही. विरोधकांकडून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवण्यात येतोय.

शेतकऱ्यांना फायदा होईल, असेच हे विधेयक आहे. शेतकरी विधेयकाला ज्यांचा विरोध आहे किंवा जे विरोध करत आहे त्यांनी हे विधेयक नीट वाचले पाहिजे. स्वामीनाथन आयोग रिकमंड करणारे शरद पवार साहेबच आहेत. शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. जे कायदे आता केंद्राने केले आहेत, ते यापूर्वीच महाराष्ट्रात होते. ते पवार साहेबांच्याच नेतृत्वाखाली इतके वर्ष चालू होते. त्यामुळे राज्यामध्ये जे हितावह कायदे आहेत, ते केंद्राने केल्यावर नुकसानीचे कसे काय ठरू शकतात, असा सवाल भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

शेतकरी कायद्याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका आश्चर्यकारक असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. दरम्यान, मोदी सरकारसाठी विरोध दर्शवणारे विद्यार्थी हे देशद्रोही, चिंतीत असणारे नागरीक शहरी नक्षलवादी, प्रवासी कामगार कोरोना वाहक, बलात्कार पीडित म्हणजे कुणीही नाही, आंदोलनकर्ते शेतकरी हे तर खलिस्तानी आणि भांडवलादर म्हणजे सर्वात चांगले मित्र आहेत. अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!